You are here:
हेन्री फोंडाचा खलनायक

अभिनेत्याच्या इतिहासाचा अतिशय कौशल्याने वापर करणारा दिगदर्शक असेल तर काय चमत्कार होऊ शकतो हे “वन्स अपऑन अ टाईम इन द वेस्ट” चित्रपटात पाहावे. हेन्री फोंडा या अभिनेत्याने आयुष्यभर सभ्य नायकाची कामे केली. सर्जियो लियॉनिने नेमके हेच हेरले आणि “वन्स अपऑन अ टाईम इन द वेस्ट” मध्ये फोंडाला खलनायक बनवले. ज्यांना हे माहित नसते त्यांना फोंडा पडद्यावर दिसताच धक्का बसतो. दिग्दर्शकीय कौशल्य म्हणतात ते हेच असावे. आज “वन्स अपऑन अ टाईम इन द वेस्ट” हा वेस्टर्न पटातील आणि एकूणच पाश्चात्य चित्रपटातील मैलाचा दगड मानला जातो.

आपल्याकडे शोलेच उदंड कौतूक झालं. एखाद्या चित्रपटातून प्रेरणा घेणे समजू शकते. तसे असंख्य चित्रपट हॉलिवूडमध्येही निघालेत. पण सर्जियोच्या “वन्स अपऑन अ टाईम इन द वेस्ट” आणि डॉलर ट्रीलॉजीतून काही दृश्य शोलेत थेट उचलली आहेत. हे अनाकलनीय आहे. कमेंटमध्ये मी तशा एका दृश्याची लिंक दिली आहे. त्यात फोंडाने साकारलेला फ्रॅंक किती क्रूर आहे हे लक्षात येईल. अनेक कंगोरे असलेला हा खलनायक नुसता क्रूरच नाही तर सॅडिस्टीक आहे. माणसाला झटक्यात मारुन टाकत नाही. त्यात इतरांना पीडा देऊन त्यांचा मानसिक छळ करून मारण्यात आनंद वाटतो.

पुढे चार्लस ब्रॉनसन हार्मॉनिका म्हणून कसा येतो आणि काय महाभारत घडते ते प्रत्यक्ष पडद्यावरच पाहण्याजोगे. फोंडाच्या खलनायकात जंगली प्राण्याला जसा धोक्याचा सुगावा फार आधी लागतो तसा एक सिक्थ सेंस आहे. एका दृश्यात ते स्पष्ट दिसते. आपल्यावर हल्ला करायला टपून बसलेली माणसे समोर दिसत नसतानाच तो सावध होतो. ब्रॉन्सन आणि फोंडा शेवटी समोरासमोर आल्यावरची गनफाइट तर जबरदस्तच. आणि त्यात इनियो मोरीकोनीचं पार्श्वसंगीत. त्याने चित्रपटातील प्रत्येक पात्रासाठी वेगळी ट्युन तयार केली आहे.

वाईट माणसे फक्त वाईट नसतात. त्यांच्या वाईटपणामध्येही अनेक कंगोरे असू शकतात. आणि त्यांच्यात काही कौशल्यही असतात म्हणून ती माणसे इतरांवर ताबा मिळवतात. फोंडाचा खलनायक हेच अधोरेखित करतो.

अतुल ठाकुर

7 Comments

  1. [2413]Ario login Philippines | Legit online slots via GCash,Gamitin ang ario login philippines para sa mabilis na access. Mag-ario app download na at alamin kung paano maglaro ng baccarat. Sali na rito! visit: ario

  2. [6395]judi88 Login Link – Trusted Online Slots in Malaysia,Access judi88 login link to enjoy online slots trusted Malaysia. Easy casino deposit via touch n go and judi88 download APK available. Join now! visit: judi88

  3. I’ve been surfing on-line more than 3 hours nowadays, yet I by no means found any interesting article like yours. It is lovely price sufficient for me. In my view, if all site owners and bloggers made just right content material as you probably did, the web will probably be much more helpful than ever before.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment