You are here:
हस्तलिखित संरक्षण आणि जतन – डॉ. सुषमा पौडवाल (संस्कृत भवनातून)

हस्तलिखिताच्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून हस्तलिखितांचे जतन कसे केले जाते, त्यासाठी कोणती काळजी घ्यावी लागते, भारतात किती ठिकाणी, किती प्रकारची, कोणत्या भाषांमधली, लिपिंमधली हस्तलिखिते उपलब्ध आहेत, परदेशात आपल्याकडली कुठली हस्तलिखिते जतन केलेली आहेत, एकंदरीत हस्तलिखितांचे कॅटलॉगींग कुठे केले आहे, हस्तलिखितांची संस्थांगणिक संख्या काय आहे अशासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळावित म्हणून या विषयातील तज्ञ डॉ. सुषमा पौडवाल यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सध्या डॉ. मोहसिना मुकादम यांच्यासोबत प्राचीन काळातील स्वयंपाकाशी संबंधित त्यांची लेखमाला लोकसत्तामध्ये प्रकाशित होत आहे. डॉ. पौडवाल यांनी संस्कृत विषयात पदव्यूत्तर पदवी प्राप्त केली असून लायब्ररी सायन्समध्ये त्यांची पीएचडी आहे. त्यांनी आमच्याशी संवाद साधत आमच्या प्रश्नांना उत्तरे देत आपले प्रेझेंटेशन केले.

हस्तलिखितांबद्दल अतिशय कळकळ असलेल्या आणि त्याबाबत तळमळीने काम करणार्‍या माणसाला सरकार दरबारी किंवा संस्थांमध्ये अनास्था दिसल्यावर किती दु:ख होते हे पौडवालांचे त्याबाबत मनोगत ऐकताना नव्याने जाणवले. हस्तलिखितांसाठी दिलेली ग्रांट बुकबाईंडिंगसाठी वापरणारे महाभाग त्यांना भेटले, मुंबईहून रिसर्चसाठी गेल्या असताना आम्ही दुपारी लायब्ररी बंद करतो. तुम्हाला फक्त सकाळी आणि संध्याकाळीच बसायला मिळेल असे कोरडे उत्तर देणारे ग्रंथपाल भेटले. घरातील दुर्मिळ हस्तलिखिते शेण्यांबरोबर सरपण म्हणून वापलेल्यांची हकिकत त्यांना ऐकायला मिळाली. भारतातील काही ठिकाणी हस्तलिखितांची दुरावस्था, डिजिटायझेशन बद्दल असलेली अनास्था, त्यासाठी उपलबध असलेला अपुरा निधी, याबद्दल त्या कळकळीने बोलल्या.

या मनोगताबरोबरच त्यांनी केलेले प्रेझेंटेशन माहितीने भरगच्च होते. हस्तलिखितांशी संबंधित सारे काही त्यात होते. हस्तलिखितांची काळजी आणि त्याचा त्या प्रदेशातील हवामानाशी संबंध हाही सांधा त्यांनी जोडून दाखवला. एशियाटिक सोसायटी, भांडारकर ओरीएंटल इंस्टीट्युट, भारतीय इतिहास संशोधक मंडळ, तंजावूरचे ग्रंथसंग्रहालय अशा भरभक्कम संस्थांची नावे पुन्हा या निमित्ताने कानी पडली. कुठले प्रोजेक्टस सुरु आहेत याची माहिती त्यांनी दिली. भारतात लाखोंच्या संख्येने हस्तलिखिते आहेत. अनेकांवर अजूनही काम होणे बाकी आहे. काहीठिकाणी मंदिरांमध्ये हस्तलिखितांचे जतन केलेले आहे. मात्र ती सर्वांनाच उपलब्ध करून दिली जात नाहीत. तेथेही धर्म आड येतो ही माहिती त्यांनी दिली.  नियमांच्या अडचणी न आणता हस्तलिखिते उपलब्ध करून दिली जावीत. विद्वानांचा वेळ वाया दवडू नये हे त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितले.

डॉ. सुषमा पौडवालांच्या व्याख्यानाच्या निमित्ताने हस्तलिखितांच्या प्राचीन दुनियेचे अतिशय गुंतागुंतीचे आणि प्रचंड स्वरूप आज लक्षात आले. एका अर्थी विश्वरूपदर्शनच घडले म्हटल्यास वावगे होणार नाही.

अतुल ठाकुर

4 Comments

  1. [2762]789bet Login PH – Mabilis na GCash Casino at Slots,Mag-789bet login ph na para sa pinakamabilis na gcash casino. Download 789bet app at subukan ang online slots na payout agad. Mag-register na rito! visit: 789bet

  2. [7067]77fd map লগইন এবং অ্যাপ ডাউনলোড | বিকাশ অনলাইন ক্যাসিনো,77fd map লগইন করে সেরা স্লট গেম সাইট এবং লাইভ ক্যাসিনো খেলার নিয়ম জানুন। বিকাশ দিয়ে অনলাইন ক্যাসিনো গেম শুরু করতে আজই অ্যাপ ডাউনলোড করুন। visit: 77fd map

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment