मानसशास्त्राचा विद्यार्थी म्हणून प्राचिन भारतीय उपचारपद्धतींबद्दल उत्सुकता होतीच. पुढे योगाभ्यासाची आवड निर्माण झाली. मग पातंजल योगसूत्र वाचण्याचा प्रयत्न केला. आपल्याकडे आरोग्याचा विचार केल्यास आयुर्वेदापासून ते योगसूत्रापर्यंत प्रचंड असं साहित्य उपलब्ध आहे. त्यात केवळ मानसोपचाराच्या दृष्टीने ही लेखमाला लिहिण्याचा विचार आहे. आणि त्यातही उपलब्ध असलेल्या साहित्यातून केवळ संस्कृत वाङ्मयातील रुपकं, कथा आणि सुभाषितांचा विचार येथे केला जाणार आहे. या विषयाची सुरुवात करण्याचे एक वैज्ञानिक कारण आहे.
मनोविकारांवर उपचार करताना मानसोपचारतज्ञ हे औषधांचा वापर करीत असतात. त्यासोबतच अनेकदा समुपदेशनाचा वापर हा प्रभावी ठरताना दिसतो. समुपदेशनात अर्थातच भाषेचे महत्व अपार आहे. मानसिक त्रास असलेली व्यक्ती जेव्हा समुपदेशकाकडे जाते तेव्हा त्या व्यक्तीचे आणि समुपदेशकाचे जे विश्वासाचे नाते तयार होते त्यावरच या उपचारांचे यश अवलंबून असते. सीबीटी, आरईबीटी, डीबीटी, एसीटीसारख्या अनेक उपचारपद्धती सध्या उपलब्ध आहेत.
एका ठिकाणी तर मी या उपचारपद्धतींची संख्या काही शेकड्यांच्या घरात असल्याचे वाचले आहे. उपचार पद्धती कोणतीही असो मात्र जोवर उपचार घेणाऱ्या व्यक्तीचे आणि समुपदेशकाचे विश्वासाचे नाते तयार होत नाही तोवर ती त्या उपचारपद्धतीचा हवा तसा परिणाम दिसून येत नाही यावर या क्षेत्रातील बहुतेक तज्ञमंडळींचे एकमत आहे. नेमके येथेच भाषेचे महत्व लक्षात घ्यावे लागते. ही भाषा वापरताना समुपदेशक जे कौशल्य दाखवतो त्यावर त्याच्या उपचारांचे यश अवलंबून असते हे सहज समजू शकते, मात्र रुग्ण जी भाषा वापरतो त्यालाही मानसोपचारांच्या संदर्भात एक अतिशय महत्वाचे असे “डायग्नोस्टीक” मूल्य आहे हे मला आवर्जून नमूद करावेसे वाटते.
रुग्णाला जो त्रास आहे त्याची तीव्रता काय आहे, त्याबद्दल रुग्णाची स्वतःची भूमिका काय आहे, त्याबद्दल त्याचे स्वतःचे असे काही समज गैरसमज आहेत का? उपचारांसंदर्भात त्याची तयारी कितपत आहे अशा अनेक गोष्टींचा अंदाज रुग्णाच्या भाषेने येऊ शकतो. समुपदेशक जी भाषा वापरतो त्यात काहीजण गोष्टी आणि मेटाफर्स म्हणजे रुपकाचा वापर करताना आढळतात. नेमके येथेच मला संस्कृतचा विचार करण्याची इच्छा आहे. संस्कृत वाङ्मय म्हणजे अशा रुपकांचा, कथांचा अक्षय असा झराच आहे. त्यासंदर्भात काय करता येईल याचा विचार संस्कृतचा एक विद्यार्थी म्हणून या लेखमालेत करण्याचा नम्र प्रयत्न आहे. (क्रमशः)
अतुल ठाकुर
#sanskritforpsychotherapy
You are here:
- Home
- मनःस्वास्थ्य
- संस्कृत साहित्य आणि मानसोपचार, एक शक्यता – भाग १
संस्कृत साहित्य आणि मानसोपचार, एक शक्यता – भाग १
3 Comments
Navigating through the game catalog is a total breeze and I never have to wait for pages to load. The live casino streams are crystal clear and the hosts are super professional. I really appreciate how they update the monthly bonus calendar so there is always something new to chase. My daily go to for some quality downtime. rusbetcasino
I have been exploring different gaming platforms for a while and this one really caught my attention with its smooth interface and fast payouts. The customer support team is super responsive and always helps you get started without any hassle. Highly recommend checking out the latest updates for new slots. m666gamelogin
Honestly I have been searching for a smooth e wallet for my game deposits and this one just clicks with me. Fast withdrawals and the interface feels so clean I play without any stress. Thanks for keeping my balance secure every time I log in. sawan789wallet