अनेकदा चित्रपट पाहताना असे जाणवते की काही नायक लौकिकार्थाने देखणे नसतातच. लौकिकार्थाने म्हणजे नाकीडोळी नीटस किंवा रंग वगैरे. पण त्यांचा स्क्रिन प्रेझेन्स जबरदस्त असतो. तसं सगळ्याचं नसतं. पिळदार शरीराचे अनेक बलदंड बाहुबली हॉलिवूडमध्ये आले आणि गेलेही. पण यांच्यात काहीतरी अनीर्वचनीय असे आहे जे शब्दात पकडता येत नाही, फक्त जाणवते. अतिशय आकर्षक वाटते. हा स्किन प्रेझेन्स म्हणजे नक्की काय ते सांगता येत नाही.
जे आम्हाला शब्दात पकडता येत नाही त्याला संस्कृत काव्यशास्त्रात काश्मिरी पंडीत आनंदवर्धनाने नवव्या शतकात शब्दरुप देऊन ठेवले आणि आमची सोय केली. ज्याप्रमाणे लौकिक लावण्याव्यतिरिक्त देखिल काहीतरी असे असते ज्यामुळे स्त्री सुंदर वाटते. यासारख्या गुणधर्मालाच त्याने काव्यात ध्वनि म्हटले. अन्यथा अंगप्रत्यंग रेखिव असलेल्या आणि सर्वार्थाने सजलेल्या सगळ्याच व्यक्ती सुंदर वाटतात असे नाही. वरील श्लोकाचा काहीसा अर्थ असा आहे. स्त्रीमध्ये लावण्य हे तिच्या अवयवांहून निराळेपणी झळकते त्याचप्रमाणे ध्वनिद्वारे काव्यात निराळा अर्थ झळकतो आणि तोच काव्याचा आत्मा आहे असे आनंदवर्धन म्हणतो. कुठल्याही कलेबद्दल लिहिताना आजतरी माझी हीच भूमिका आहे.
आपल्या स्मिता पाटीलमध्ये असेच काहीतरी अतीव आकर्षक होते असे मला वाटते.
हाच गुणधर्म काही नायकांनादेखील लावता येईल. चार्ल्स ब्रॉन्सन हा माझा अतिशय आवडता अभिनेता. त्याला कुणी देखणा म्हणेल असं वाटत नाही. मात्र त्याचे चित्रपट पाहताना मला हे आकर्षण नेहेमी जाणवत असतं. काहीशी अशी भावना मला अमिताभचा दिवार पाहताना जाणवली होती. फक्त तो डॉकमध्ये काम करत असतो तोपर्यंतच.
ब्रॉन्सनचा डेथविशचा पहिला भाग ज्यांनी पाहिला आहे त्यांना मला काय म्हणायचे आहे ते नक्की कळेल. (बाकी त्यात एक बलात्कार इतका भयानक चित्रित केला आहे की कधीही हा चित्रपट पाहताना मला तो टाळूनच पाहावा लागतो इतक्या परिणामकारकरित्या माणसाचं पाशवीपण त्यात दाखवलं गेलं आहे.) पण जेव्हा ब्रॉन्सन पडद्यावर येतो तेव्हा फक्त त्यानेच पडदा व्यापलेला असतो. म्हटलं तर ओबडधोबड, रापलेल्या चेहर्याचा हा माणुस आपल्याकडच्या चॉकलेट हिरोच्या संकल्पनेपासून कित्येक योजने लांब. पण त्याचे हे शब्दाने न सांगता येणारे अस्तित्व पडद्यावर लगेच जाणवते.
वन्स अपॉन अ टाईम इन द वेस्ट मध्ये तर तो फारसा बोलतच नाही. त्याचे डोळेच बोलतात. पण असे असतानाही त्याचे एकूण अस्तित्व बोलत असते. त्याचे चालणे, त्याचा आवाज, त्याची नजर यात “पॉलिश्ड” असे काही नाही. या माणसाने कोळशाच्या खाणीत काम केले होते असे कुठेतरी वाचल्याचे आठवते. मात्र एखाद्या कोळशाच्या ओबडधोबड पृष्ठभागावरील माती धुवून गेल्यावर तेथे अचानक पाचूचे रत्न चमकावे त्याप्रमाणे ब्रॉन्सनचा करिश्मा पडद्यावर जाणवतो. जे आकर्षित वाटते ते काय आहे कळत नाही. आपण फक्त म्हणायचे …..विभाति लावण्यमिवाङ्गनासु
अतुल ठाकुर
विभाति लावण्यमिवाङ्गनासु
8 Comments
[3063]Kupangtoto | Link Alternatif Resmi & Slot Gacor Hari Ini,Kupangtoto menyediakan link alternatif resmi untuk akses mudah. Nikmati daftar casino terpercaya dan kemudahan deposit via Dana. Daftar sekarang juga! visit: kupangtoto
Great vibes and even better rewards. I feel like I actually have a chance to win big here compared to other sites. krlucklandcasino is the real deal.
Slot fans will definitely fall in love with this place because the games run so smoothly and the bonus features keep things exciting. I appreciate how easy it is to navigate and find my favorite titles without any confusion. Just started playing recently and already hit a nice little bonus run. Take a look at jokerbetcasinoslots and let me know what you think. jokerbetcasinoslots
Such a friendly community and a great selection of games. I spend a few hours here every weekend and it never gets boring. Love vnzl88.
[271]1xbet লগইন এবং অ্যাপ ডাউনলোড | বিকাশ ক্যাসিনো ও স্লট গেম,1xbet login বাংলাদেশ এবং অ্যাপ ডাউনলোড করে উপভোগ করুন সেরা অনলাইন স্লট গেম। বিকাশ দিয়ে অনলাইন ক্যাসিনো ডিপোজিট করে আজই খেলা শুরু করুন। visit: 1xbet
The promotions here are just insane. I love how they keep adding new events for the players. If you are looking for action go to vn123win01.
Absolutely loving the vibe and the winning streaks I’ve had here. Definitely my new favorite spot. Visit pkxxxx555 for some action!
The mobile app is a game changer. It’s way more convenient than using a browser and everything loads instantly. You guys should grab the bdl444appapk right now.