हा प्रश्न अनेकांना चमत्कारिक वाटण्याची शक्यता आहे. पण एक योगशिक्षक म्हणून काही वर्षे मला जो अनुभव आला आहे त्यावरून या प्रश्नाचा मला खरोखर गंभीरपणे विचार करावासा वाटतो. पातंजल योगसूत्रात योग कुणाला साध्य होईल याबद्दल सांगताना भगवान पतंजली म्हणतात दीर्घकाल, निरंतर आणि आदरसहीत योगाभ्यास केल्यास तो दृढ होतो. मात्र समाजात जर पाहिलं तर वेगळंच चित्र दिसून येतं. योग ही एक जीवनशैली आहे. तिचा अंगिकार जीवनशैली म्हणूनच करावा लागतो. व्यसनमुक्तीसाठी योगाभ्यास करणार्यांनी तर योग हा जीवनशैली म्हणूनच स्वीकारणे अपेक्षित आहे. पण माणसे योग वर्गात येतात आणि पहिला प्रश्न विचारतात “आम्हाला हे किती दिवस करावे लागेल?”
काहींना योग हे वय वाढल्यावर करण्याची गोष्ट वाटते. काहींना काही तरी फास्ट एनर्जेटीक करायला हवं असतं आणि ते योगात नाही म्हणून ती माणसे आम्हाला झूंबा आवडतं असं म्हणतात. कुणाला काय आवडावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण आंब्याच्या झाडाकडे जायचं आणि सफरचंदाची अपेक्षा ठेवायची याला फारसा अर्थ नाही. योग हा अशा माणसांसाठी नाही अशी माझी नम्र समजूत आहे. योग करण्याची काही एक विशिष्ट अशी पारंपरिक पद्धती आहे. त्यात योग करताना श्वास कसा घ्यावा याच्या काही परंपरा आहेत. अर्थात इतर गोष्टींप्रमाणे योग हा देखिल एक व्यवसाय झाला असल्याने व्यवसायाचे गणित सांभाळून त्यात काही लोकप्रिय गोष्टींचा समावेश करून सर्वांना आवडेल अशी भेळ करून देणारी मंडळीही आहेत.
मात्र आपल्याला योग करायचा आहे तो व्यसनमुक्तीला सहाय्यक व्हावे यासाठी. असे एक निरिक्षण आहे की व्यसन असणारी बहुतेक माणसे ही तथाकथित “डॅशिंग” स्वभावाची असतात. या सो कॉल्ड “डॅशिंग” स्वभावाला आळा घालायचा तर “डॅशिंग” व्यायाम कसे चालणार? तेथे योगासारखे हळूवार प्रकारच उपयुक्त ठरतील असे मला वाटते.
अतुल ठाकुर
योग आणि व्यसनमुक्ती – ४ – योग खरंच सर्वांसाठी आहे का?
4 Comments
I love the variety of games available here. There is always something new to try and the bonuses are actually fair. Great vibes all around at ab777casino.
[9168]Xoso666 | Link vào trang chủ và hướng dẫn chơi nổ hũ,Truy cập xoso666 qua link vào chính thức để tải app xoso666 tiện lợi. Khám phá cách chơi baccarat online và mẹo quay hũ nổ hũ hiệu quả. Đăng ký tham gia ngay. visit: xoso666
If you are looking for the official app, this is the place to get it. No lag and the mobile experience is just seamless. Visit okbetappdownloadapk
MG188gold! Sounds fancy and plays fancy no cap. Check it out and thank me later mg188gold!