संशोधनाच्या दरम्यान असे दिसून आले आहे की घरात व्यसन असेल तर सहचरींची मानसिक स्थिती अनेकदा ढासळलेली असते कारण प्रचंड शारिरीक आणि मानसिक त्रास असतो. इतका की काहींच्या मनात आत्महत्येचे विचारही आलेले असतात. व्यसन या आजाराचे वेगळेपणही येथे लक्षात घेणे आवश्यक आहे. उपचार घेतल्यावर सर्व काही संपत नाही. उलट तेथूनच खर्या अर्थाने प्रवास सुरु झालेला असतो. अशावेळी सहचरींनी मनावर संयम ठेवणे महत्त्वाचे असते. एखादा वावविवाद, भांडण यामुळे सारी मेहनत पाण्यात जाऊ शकते.
व्यसनमुक्तीच्या मार्गावर माणूस चालु लागला तरीही मनात संशय, भीती असतेच. आपल्या माणसाला थोडाजरी उशीर झाला तर मनात संशयाची पाल चुकचुकतेच. याचं कारण अनेक वर्षे अपेक्षाभंग झालेला असतो. अशावेळी मनस्थिती सावरण्यासाठी योगाभ्यासाचा उपयोग होऊ शकेल असे मला वाटते.
मन ताळ्यावर ठेवण्याचे उपाय अनेक आहेत. हे सदर योगविषयक आहे याचा अर्थ योग हा एकमेव उपाय आहे असे माझे म्हणणे नाही. ज्याला जे आवडतं ते त्याने करावं. शरीर आणि मनाने तंदुरुस्त राहण्याशी कारण. अनेक जणी चालण्याचा व्यायाम घेत असतील. काहीं जिम मध्ये जात असतील. शरीर निरोगी ठेवण्याचा प्रकार कुठलाही असो पण सहचरींच्या दिनचर्येमध्ये दररोज नियमितपणे व्यायाम असायला हवा असे मला वाटते. त्याचबरोबर योगवर्गाचे असे वेगळे फायदेही आहेत असे मला योगाचा विद्यार्थी म्हणून जाणवले आहे.
येथील लेखनात योगाभ्यासाविषयी आपल्या काही शंकांचे निरसन होईल असे मला वाटते आणि योगाभ्यास करण्याबद्दल आमच्या माता, भगिनी प्रवृत्त होतील असा विश्वासही वाटतो. घराजवळ असलेल्या योगवर्गात प्रवेश घेऊन, नियमित योगाभ्यास करून आपले शरीर आणि मन निरोगी ठेवणे ही सहचरींसाठी अत्यावश्यक बाब आहे असे माझे प्रामाणिक मत आहे. कारण व्यसन काय, व्यसनमुक्ती काय बरेचदा या सार्याचा ताण कळत नकळत सहचरींवरच येत असतो. आणि त्याचा शरीर आणि मनावर अपरिहार्यपणे परिणाम होतच असतो. सहचरीच आजारी झाल्या तर व्यसनी माणसाकडे कोण पाहणार? घरातल्या ज्येष्ठ मंडळींकडे कोण पाहणार? लहान मुलांकडे कोण पाहणार? असंख्य शेयरींग्ज ऐकताना हे जाणवले आहे की सहचरींच्या पुढकाराने व्यसनमुक्तीचा श्रीगणेशा झाला. तेव्हा योगाभ्यास हा सहचरींसाठी अतिशय उपयुक्त आहे इतकेच नव्हे तर घरातील व्यसन घालवण्यासाठीही त्याची गरज आहे असे मला वाटते.
आपला
अतुल ठाकुर
योग आणि व्यसनमुक्ती – २ – सहचरींनी योगाभ्यास का करावा
4 Comments
Yo, az888be is where its at! I recently tried it and its pretty awesome with its features. Definitely recommended if you want something reliable. Check it out: az888be
B52.cc bringing the heat! The games run smooth and the community seems pretty active. A fine place to hang out. Go give it a look: b52.cc
Been using Nesine for a while now, and it’s pretty solid. Good platform for sports betting, no complaints here. Give it a shot! See for yourself: nesine
Get ready for a wild ride with this tower defense gem! The strategic depth is awesome, and the quirky characters make every match a blast. If you’re looking for something fresh and fun, plants vs brainrots original mod is a fantastic choice. Highly recommend for some engaging strategic fun!