आज प्रा. वेशाली दाबके आणि सौ. तरंगिणी खोत यांनी घेतलेली डॉ. सिंधू डांगे यांची दोन भागातील अतिशय सुरेख मुलाखत पाहिली आणि संस्कृतचा विद्यार्थी असूनही या ऋषितूल्य व्यक्तीमत्वाबद्दल आपल्याला फारसे माहित नव्हते यासाठी मी थोडा ओशाळलोच. संस्कृत शिकत असताना डांगे मॅडमना पाहिले होते. वेद, पुराणे, आणि त्या संबंधित अनेक विषयांवर प्रभुत्व असलेलं, त्या विषयांमधील संशोधनपर असेल अनेक पेपर्स आणि पुस्तके नावावर असलेलं एक अत्यंत विद्वान व्यक्तीमत्व अशी त्यांची मला माहिती होती.पण हे फक्त हिमनगाचे टोकच असेल असं वाटलं नव्हतं. डांगे मॅडम आज त्यांच्या वयाच्या सत्त्यांशियाव्या वर्षी आपल्या संशोधनात नुसत्या गढलेल्याच नाहित तर त्यांची काही नवी पुस्तकेही येऊ घातली आहेत. मला आपल्या आवडत्या विषयात गढलेली माणसं पाहिली मी मनोमन त्यांना दंडवत घालावासा वाटतो कारण मला ते फार फार भाग्याचं वाटतं. डांगेमॅडमना अनेक मानसन्मान मिळाले. राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, महामहोपाध्याय ही पदवीदेखील मिळाली. आज जगभरातील अनेक विद्यापिठांमध्ये त्यांची पुस्तके आहेत. पण ही माहिती कदाचित मला त्यांचा बायोडेटा वाचूनही मिळाली असती. या मुलाखतीचं अप्रूप हे की ती अनौपचारिक होती. डांगेमॅडम यांच्या घरी ती घेतली गेली आणि खरंच म्हटल्याप्रमाणे त्या दिलखुलास गप्पाच होत्या. त्या मर्यादित कालावधीच्या गप्पांमध्ये या ज्ञानरुपी हिमनगाचा उरलेला सर्व भाग दिसणे शक्यच नव्हते पण तो किती अफाट असू शकेल याची काहिशी कल्पना मात्र आली. त्यासाठी सर्वप्रथ दाबके मॅडम आणि तरंगिणी मॅडम यांचे खूप खूप आभार मानावेसे वाटतात.
संस्कृत क्षेत्रात पतीपत्नी दोघेही संशोधक आणि संस्कृत जगतात सुप्रसिद्ध शिवाय दोघेही मुंबई विद्यापिठाच्या संस्कृत विभागाचे प्रमुख असा अतिशय दुर्मिळ योग डांगे पतीपत्नींच्या बाबतीत जुळून आला होता. डांगे सरांना प्रमुख म्हणून फारसा कालावधी मिळाला नाही मात्र डांगे मॅडम जवळपास तेरा वर्षे विभागप्रमुख होत्या. म्हणजे त्याकाळी त्यांनी मुंबई विद्यापिठाच्या संस्कृत विभागाची पायाभरणी केली म्हणायला हरकत नाही. आज डांगेपतीपत्नींच्या हाताखाली तयार झालेले त्यांचे अनेक विद्यार्थी, विद्यार्थीनी संस्कृत क्षेत्रात अनेक ठिकाणी मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत, संशोधन करताहेत, संस्कृतचा प्रचार प्रसार करताहेत. याचे श्रेय डांगेमॅडमच्या आपल्या शिष्यांना प्राथमिकता देण्याच्या स्वभावाला द्यायला हवं. प्रथम आपले विद्यार्थी, ते पुढे यायला हवेत. त्यांच्यासाठी धडपडायचं हा या विद्वान पतीपत्नींचा स्वभाव. डांगेमॅडम यांनी पतीसोबत आणि पुढे एकट्यानेही संशोधनाच्या निमित्ताने खूप प्रवास केला. भारतीय प्राचिन संस्कृतीतील यज्ञ, त्यातील क्रिया त्याला जोडून आलेल्या कथा, त्यातील अर्थवाद, त्यासंबंधीची निरनिराळी प्रतिकं, यावर त्यांनी वेद, ब्राह्मणं, पुराण यांच्या आधारे प्रचंड संशोधन केलं जे आजही अविरत सुरु आहे. डांगेमॅडम बोलत असताना त्यांच्यातला संशोधक कायम जागा असला तरी आपल्या प्राचिन संस्कृतीबद्दल असलेलं त्यांचं ममत्व लपत नव्हतं. ही गोष्ट मला अतिशय विलोभनीय वाटली. पंजाबमधील होशियारपूर येथे असलेल्या मॅन्युस्क्रिप्टच्या प्रचंड संग्रहाचं त्यांना कोण कौतूक. ती फळणीनंतर पाकिस्तानमधून इथे कशी आली याचाही एक किस्सा त्यांनी सांगितला.
इतके मान सन्मान मिळूनही डांगेमॅडम स्वतःच्या संशोधनाबद्दल आणि त्यासाठी संशोधनक्षेत्रात त्यांना मिळालेल्या मान्यतेबद्दल बोलताना अतिशय संकोचत होत्या. किंबहूना त्याबद्दल काही वाक्यात बोलून त्या इतर गोष्टींबद्दल बोलू लागत. मुलाखतीच्या दरम्यान दाबकेबाईंनी त्यांना भेटलेल्या विद्वानांबद्दल विचारले आणि डांगेमॅडम भरभरून बोलू लागल्या. मुंबई विद्यापिठातील संस्कृत विभागाच्या प्रमुख डॉ. बाकरे मॅडम यांचे वडिल डॉ. देशपांडे त्या रुईयाला असताना विभागप्रमुख होते. त्यांच्या शिकवण्याबद्दल त्या म्हणाल्या की वर्गात ते शिकवत असताना स्वतः आदीशंकराचार्य जरी समोर आले असते तर त्यांनी स्वतःचा अद्वैत वेदांताचा सिद्धात्न शिकवायला देशपांडे सरांनाच पुढे केलं असतं इतकं ते सुरेख शिकवायचे. त्यानंतर आपल्या पतीचे गुरु डॉ. वेलणकर यांच्या विद्यार्थ्यांमधील लोकप्रियतेबद्दल त्या बोलल्या. अनेक विद्वानांकडून आपल्याला प्रेरणा मिळाली असे सांगत असताना आपले प्रेरणास्रोत आपले पती आहेत हे देखील त्यांनी सांगितले. डॉ. डांगेसरांचा उल्लेख त्यांनी वर्तमानकाळातच केला. त्यांचे संशोधन, त्यांची पुस्तके, त्यांचे विचार यात डांगेमॅडम वावरत असताना त्यांना पतीचे अस्तित्व नेहेमी जाणवत असते, प्रेरणा देत असते. त्यांच्या संशोधनाबद्दल बोलताना जेव्हा ऐकलं तेव्हा आपण एक अफाट व्यक्तीमत्व पाहत आहोत हे लक्षात आलं.
आपला संसार, नोकरी, सर्व सांभळून डांगेमॅडमनी प्रचंड संशोधन केले, पुस्तके लिहिली, अजूनही लिहिताहेत. त्याचे श्रेय त्या वडिलांच्या शिस्तीला देतात. ते त्यांना उद्याचे काम आज आणि आजचे काम आता करायला सांगत. वेळेचे महत्व, कामाचे नियोजन, विद्यार्थ्यांना वेळ देणे, त्यांचे प्रबंध तपासणे, स्वतःचे संशोधन, त्यासंबंधीचे पेपर्स याबाबतीत त्या अतिशय वक्तशीर आहेत. कधीही कशालाही उशीर नाही. त्यामुळे त्या विभागप्रमुख म्हणूनही अतिशय यशस्वी होत्या. त्या म्हणाल्या संसाराची सर्व कामे उरकून त्या रात्री दहा वाजता आपल्या अभ्यासाला बसत. दहा ते एक, दीड पर्यंत त्यांचा अभ्यास चालत असे. त्यांचे पती, तुला अशाने निद्रानाशाचा आजार जडेल असे म्हणत. पण डांगेमॅडम गेली पन्नास साठ हून अधिक वर्षे असाच अभ्यास केला. त्यावेळी त्यांनी नवे विचार सुचले, एखादा कूट प्रश्न अनेक दिवस अभ्यास करून सुटला की अतिशय आनंद वाटत असे असे सांगितले. ज्ञान उपभोगणे म्हणजे हेच. यासारखे दुसरे भाग्य नसेल. पातंजल योगसूत्रामध्ये भगवान पतंजलींनी मनस्वास्थ्याचा एक उपाय “एकतत्वाभ्यास” हा सांगितला आहे. डांगेमॅडम यांचे सारे आयुष्य त्यांच्या आवडत्या विषयाच्या संशोधनात जात असल्याने हा एकतत्वाभ्यास घडत असावा. त्यामुळे वयाच्या सत्याऐशियाव्या वर्षीदेखील त्या आपल्या संशोधनात तितक्याच कार्यरत आहेत. त्यांची स्मृती तितकीच तल्लख आहे. कुठल्या कपाटात कुठली पुस्तके आहेत, कुठले संदर्भ कुठल्या ग्रंथात मिळतील, कुठल्या श्लोक कुठल्या वेदात आहे याची माहिती त्या पटापट सांगताना पाहून अवाक व्हायला होते.
संपूर्ण मुलाखतीत त्यांनी प्राचीन कथांची अनेक उदाहरणं दिली, अतिशय सोप्या भाषेत आपल्या काही संशोधनाबद्दल समजवून सांगितले. ते सारे मुलाखत पाहताना दिसेलच. पण या संशोधनामागचा त्यांचा स्वभाव आणि सातत्य मला अतिशय प्रेरणादायक वाटलं. संशोधनाच्या क्षेत्रात धडपड करणारा आणि संस्कृतचा अभ्यास करणारा एक विद्यार्थी म्हणून मला डांगेमॅडमशी माझं नातं सांगावंसं वाटतं. त्यांचा ज्ञानयज्ञ आजही सुरु आहे पण त्यातून प्रेरणा घेऊन आपल्याला एखादी ठिणगी जरी पडता आली तरी मी स्वतःला भाग्यवान समजेन. आज धूलीवंदनाच्या दिवशी दाबके मॅडम आणि तरंगिणी मॅडम यांच्यामुळे संशोधनाच्या रंगात दिवसभर रंगलो. त्यांचे पुन्हा आभार मानून मनोमन डांगेमॅडम यांच्या पायावर डोके ठेवून त्यांचे आशीर्वाद मागतो.
अतुल ठाकुर
डॉ. सिंधू डांगे, अविरत चाललेला ज्ञानयज्ञ
6 Comments
So I saw https //ku11.net floating around. Gave it a try, and it’s alright. Just sayin’, might be worth your time to peep this: https //ku11.net
Heard about winmii, decided to check it out. What do you guys think of this platform? Any experiences to share? winmii
Chasing the Tai88Vin link for the APK? Bingo, right here: tai88vin.link apk. Get downloading!
The other day, while I was at work, my sister stole my iphone and tested to see if it can survive a 40 foot drop, just so she can be a youtube sensation. My iPad is now broken and she has 83 views. I know this is completely off topic but I had to share it with someone!
I precisely desired to say thanks again. I’m not certain the things that I could possibly have followed in the absence of those smart ideas provided by you directly on such a topic. This has been a very frightful concern in my opinion, nevertheless taking note of the professional manner you handled the issue forced me to leap over joy. Now i’m happier for the support as well as wish you recognize what an amazing job you are putting in instructing many people using a web site. I’m certain you have never come across all of us.
Very impressive selection of games and the local payment methods make everything so much easier. I am very satisfied with this service. vnneu88