एखाद्या कलेच्या प्रेमात पडलेली, कलेला वाहून घेतलेली माणसं नुसतं पाहणं हा देखील मोठ्या आनंदाचा भाग असतो. कारण त्या कलेच्या ध्यासाने, उपासनेने त्यांच्या व्यक्तीमत्वावर एक तेज झळकत असतं. त्यांचे मनोगत ऐकणे हा तर सुरेख अनुभव असणारच. काल आमच्या पर्किन्सन्स मित्रमंडळात बारा वर्षे आमच्या शुभार्थींना नृत्याचे धडे देऊन त्यांना पार्किन्सन्सचा आजार विसरायला लावणाऱ्या नृत्यगुरु ऋषिकेश पवार याची मुलाखत शोभनाताईंनी घेतली आणि हा सुरेख अनुभव आम्हाला दिला. सुरुवातीलाच ऋषिकेश पवार यांनी आपला झूम मिटिंगचा स्क्रिन ऍडजस्ट करीत एका छानशा झाडाची कुंडी फोकसमध्ये आणली आणि बाजूला ते स्वतः बसले. ती फ्रेम एकदम देखणी दिसू लागली. इथेच त्यांच्या सौंदर्यदृष्टीची कल्पना आली. पुढचे त्यांचे सारे बोलणे बोलणे हे नृत्यातील सौंदर्याबद्दल, त्यातील आनंदाबद्दच होते.
पुण्यात मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या आणि अगदी सुरुवातीपासून नृत्याचा ध्यास घेतलेल्या ऋषिकेशना रोहिणी भाटेंसारख्या गुरु लाभल्या आणि त्यांच्या कथ्थक शिक्षणाला सुरुवात झाली. रोहिणी भाटेंकडून ते नुसते नृत्यच शिकले नाही तर त्यांची नृत्याबद्दलची एक विशिष्ट दृष्टी तेथे विकसित झाली. आपल्या या पहिल्या गुरुबद्दल आदराने बोलताना ते थकत नाहीत. ते म्हणाले मी जेव्हा काही करतो त्याला एक विशिष्ट दर्जा हा असलाच पाहिजे हा मी स्वतःच स्वतःशी केलेला करार आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे लागायचे नाही. पैसा किंवा प्रसिद्धी मिळेल म्हणून आपल्या कामाचा दर्जा खाली आणायचा नाही. आपल्याकडे आलेल्या प्रेक्षकाच्या अभिरुचीचा दर्जा आपल्या कलेने वाढला पाहिजे ही शिकवण त्यांनी रोहिणी भाटेंकडून घेतली. त्यानंतर त्यांनी पारंपरिक नृत्याला सोबत घेऊन समकालिन नृत्याची स्वतःची वेगळी वाट धरली.
ऋषिकेश पुढे नृत्याचा अभ्यास करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवून जर्मनीला गेले. तेथे त्यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला आणि स्वतःचा वेगळा असा दृष्टीकोण घेऊन ते पुण्यात आले. पुण्यात आल्यावर स्वतःचे सेंटर सुरु करणे सोपे नव्हतेच. पण त्यांनी अनेक प्रेझेंटेशन्स दिली, व्याख्याने दिली, जागोजाग जाऊन ते लोकांशी प्रत्यक्ष बोलले. आणि सेंटरचे काम हळुहळु सुरु झाले. आज बारा वर्षांनंतर त्यांच्या सेंटरचा पसारा देशात आणि परदेशातही पसरला आहे. निरनिराळ्या प्रकारचे कोर्सेस, इंटर्नशीप्स येथे घेतले जातात. निरनिराळ्या वयाच्या माणसांसाठी येथे त्यांना नृत्याचा आनंद घेता यावा म्हणून अभ्यासक्रम आहेत. ऋषिकेश स्वतः सातत्याने देशात आणि परदेशामध्ये प्रसिद्ध संस्थामध्ये शिकवत असतात. आपल्या या प्रवासाबद्दल बोलताना मला जाणवला तो त्यांचा प्रांजळपणा.
सुरुवातीला त्यांच्या वडिलांना आपला मुलगा वाया गेला असे वाटत होते. कारण नृत्य शिकण्यासाठी ते रात्री उशीरापर्यंत बाहेर राहात. पण एकदा जेव्हा त्याच्या आईवडीलांना खरा प्रकार कळला तेव्हा त्यांचा आपल्या मुलावर पूर्ण विश्वास बसला. त्यानंतर ऋषिकेश जर्मनीला असताना त्यांच्या वडिलांनी आपल्या मुलाने लिहिलेल्या लेखांची सर्व कात्रणं एकत्र केली आणि खोलीत फ्रेम करून लावली. ऋषिकेश यांच्या कामाचा पुढचा टप्पा हा नृत्योपचारांचा होता. इतकी वर्षे उलटल्यावर त्यांना “उपचार” हा शब्द वापरणं योग्य वाटत नाहीत. माणसे येतात आणि नृत्याचा आनंद घेतात इतकेच ते म्हणतात. आजार, उपचार असे शब्द वापरले की त्याला वेगळी पार्श्वभूमी लाभते आणि त्यातून आनंद ओहोटीला लागतो असे त्यांचे म्हणणे आहे.
पूढे संचेती इस्पितळात त्यांनी आपल्या नृत्याविषयी प्रयोगांना सुरुवात केली आणि त्या प्रयोगाचा वेलू आता गगनावरी गेला आहे हे त्यांच्या सातत्याने बारा वर्षे एकही पैसा न घेता आमच्या मंडळाला दिलेल्या शिक्षणाने सिद्ध झाले आहे. फक्त आमच्या पार्किन्संस मित्रमंडळाचा संदर्भ जरी घेतला तरी त्यात त्यांना त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य लोक मिळाले. कुणाला ते देव वाटतात, कुणाला त्यांच्यात आपला मुलगा दिसतो, कुणाला भाऊ दिसतो, कुणाला मित्र दिसतो तर कुणाला ते तत्वज्ञ वाटतात. घरातून बाहेर निघायला नाखूश असणाऱ्या पार्किन्सन्सच्या रुग्णांना त्यांनी स्वतःच्या मनाने , नृत्याच्या क्लासच्या ओढीने घराबाहेर पडायला भाग पाडले. हे त्यांचे फार मोठे यश आहे. त्यांच्याकडे नृत्य शिकायला लागल्यानंतर रुग्णांपैकी मुळे कुणी पुन्हा गाडी चालवू लागले, कुणाचा आत्मविश्वास वाढला, कुणाची औषधे मर्यादेत राहिली तर कुणाच्या गोळ्या कमी झाल्या. आता तर न्युरॉलॉजिस्टही या नृत्याच्या वर्गाची शिफारस करीत असतात.
याबद्दल बोलताना मला जाणवला तो ऋषिकेश यांचा साधेपणा. त्यांचे बोलणे ऐकताना ही व्यक्ती परदेशातून शिकून आलेली व्यक्ती आहे असे जाणवत नाही. पण निश्चितपणे जाणवते ते म्हणजे या व्यक्तीने नृत्य या विषयावर केलेले प्रगाढ चिंतन. त्यांना आपल्या हातून नृत्याच्याद्वारे सातत्याने काहीतरी सकारात्मक घडावे हा ध्यास आहे. नृत्याचा बाऊ, वयाचे बंधन, हालचालीमधल्या त्रुटी, आजाराच्या मर्यादा या साऱ्यांच्या पलिकडे जाऊन ते नृत्याचा आनंद घ्यायला शिकवतात.आणि त्यांचे बोलणे ऐकताना हे जाणवतं की ते स्वतः क्षणोक्षणी तो आनंद घेत आहेत. आपल्याला जे आवडते तेच आयुष्यभर करायला मिळणे यासारखी भाग्याची गोष्ट दुसरी नाही. आणि ते भाग्य लाभलेले ऋषिकेश नृत्य जगत असतात आणि त्यातील आनंद घेत असतात.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही त्यांच्या विडियोची एक फित दाखवली. मी ती दाखवत असताना त्यांच्याकडे पाहात होतो. काही क्षणातच ते डोलू लागले आणि त्यांनी हातावर ताल धरला. आजाराचा बाऊ करणे त्यांना मान्य नाही. आजार तुम्ही जितका मोठा कराल तितका तो मोठा असतो आणि जितका लहान कराल तितका छोटा होतो असे ते म्हणतात आणि त्यांच्या या म्हणण्याला त्यांच्या इतक्या वर्षांच्या अनुभवाचा भक्कम आधार आहे. शुभार्थी शुभंकरांचे संबंध कधीकधी तणावपूर्ण होऊ शकतात. पण ऋषिकेश मात्र प्रत्येकाला काका, काकू, ताई, आजी असे प्रेमाने संबोधून अगदी ऑनलाईन क्लासमध्येही त्यांना नृत्य करायला लावतात. शोभनाताईंनी त्यांच्याबद्दल बोलताना एका ठिकाणी आईच्या मायेने ते आमच्या पेशंटला शिकवतात असे म्हटले. त्याचाही प्रत्यय जेव्हा ते आपल्या विद्यार्थ्यांबद्दल बोलत होते तेव्हा त्यांच्या बोलण्यातून जाणवत असलेल्या आपल्या विद्यार्थ्यांबद्दलच्या प्रेमाने आला.
ऋषिकेश यांचे काम इतके मोठे आहे की एका लेखात त्या कामाचा आढावा घेणे शक्य नाही याची मला नम्र जाणीव आहे. कला आणि व्यक्ती यातील अद्वैत त्यांच्यात मला जाणवले हे मला आवर्जून नमुद करावेसे वाटते. ऋषिकेश म्हणजेच नृत्य आणि नृत्य म्हणजेच ऋषिकेश. गीतेत एका ठिकाणी भगवंतांनी म्हटले आहे की जेव्हा एखाद्या ठिकाणी काही विशेष शक्ती आढळेल तेथे माझा निवास आहे असे समज. ऋषिकेशना पाहून त्या ओळींचा तंतोतंत प्रत्यय आला हे निश्चित.
अतुल ठाकुर
You are here:
- Home
- मनःस्वास्थ्य
- एका देवमाणसाबद्दल…
एका देवमाणसाबद्दल…
6 Comments
I’ve been using this platform for a while now and the experience is just smooth. Definitely one of the best choices for gaming. Check out pkbaij999 for more info.
Finally found a reliable source for the app. The installation was smooth and it runs perfectly on my phone. Definitely check out spin777apkdownload for a quick setup!
I’ve tried many platforms but this one feels more rewarding. Give vnmk88 a shot if you want a reliable place to play.
Hello. excellent job. I did not anticipate this. This is a impressive story. Thanks!
[2033]cricbet লগইন এবং অ্যাপ ডাউনলোড | বিকাশ ক্যাসিনো ডিপোজিট,cricbet লগইন করে উপভোগ করুন লাইভ ক্যাসিনো বোনাস অফার। দ্রুত cricbet app download apk করুন এবং অনলাইন স্লট গেম ট্রিকস শিখে আজই খেলা শুরু করুন। visit: cricbet
The app version is just so much more convenient than the browser. Everything is snappy and the bonuses for new users are actually decent. Loving br43betapp so far.