संस्कृत साहित्यात सज्जन आणि दुर्जन किंवा खल, दुष्ट प्रवृत्तीची माणसे आणि संत यांचा खूप उहापोह केला गेला आहे. विशेषतः सुभषितांमध्ये याबद्दल बरीच चर्चा आहे. आधुनिक मानसशास्त्रातील निरनिराळ्या उपचारपद्धतींमध्येही उपद्रवी माणसांबद्दल चर्चा आढळते. अशा लोकांशी कसे वागावे याबद्दल समुपदेशन केलं जातं. संस्कृत साहित्याचे वैशिष्ट्य असे की त्यात सूत्रबद्ध रीतीने हे उपदेश केलेले असतात. त्यामुळे त्याचा अर्थ काहीवेळा वेगवेगळा लागू शकतो. श्लोकांमध्येही अर्थ ठासून भरलेला असतो. त्यामुळेच असेल कदाचित पण एका भगवद्गीतेचे विद्वानांनी वेगवेगळ्या दृष्टीकोणातून अर्थ लावलेले दिसतात.
आधुनिक मानसशास्त्र आणि मानसोपचारांमध्ये निरनिराळ्या पद्धतींचा वापर मनोविकारांच्या उपचारांसाठी केला जातो. त्यात मेटाफर म्हणजेच रुपकांचाही वापर वैपुल्याने आढळतो. संस्कृत साहित्य म्हणजे रुपकांची खाण किंवा कधीही न आटणारा झराच आहे म्हटलं तरी चालेल. आपले म्हणणे समजवून देण्यासाठी संस्कृत साहित्यकारांनी रुपकांचा वापर प्रभावीपणे केलेला आढळतो. रुपकं, उपमा, निरनिराळ्या गोष्टी, यांचा वापर आधुनिक मानसशास्त्रही करताना आढळते कारण मनोविकाराने त्रासलेला रुग्ण हा काहीवेळा तर्कबुद्धी वापरण्याच्या मनस्थितीत नसतो. पुढील सुभाषितामध्ये खलप्रवृत्तीला कसे तोंड द्यावे याचे मार्गदर्शन केले आहे.
खलानां कण्टकानांच द्विविधैव प्रतिक्रिया |
उपानन्मुखभंगो वा दूरतो वा विसर्जनम् ||
मार्गात येणाऱ्या खलप्रवृत्ती आणि काटे यांना तोंड देण्याचे दोन उपाय आहेत. एक म्हणजे पादत्राणाने त्यांचा मुखभंग करणे. दुसरा म्हणजे त्यांना टाळणे.
या सुभाषितात दुष्टप्रवृत्ती आणि कंटक म्हणजे काट्याची तूलना केली आहे. सर्वप्रथम खलप्रवृत्तीसाठी काट्याचे रुपक हे अतिशय प्रभावी आहे हे मान्य करावे लागेल. काटे येणाऱ्याजाणाऱ्याच्या रस्त्यात पडलेले असतात आणि त्यावर पाय पडला की ते टोचतात. समाजात दुर्जनांशी संपर्क आला की दुःखच होते. त्यापासून दुःखाशिवाय दुसरे काहीही लाभत नाही.
(क्रमशः)
अतुल ठाकुर
2 Comments
Keep up the superb piece of work, I read few content on this web site and I conceive that your web site is really interesting and contains lots of great information.
Best betting odds I have seen in a long time. The transparency of the site makes me feel safe. Definitely check out br850bet.