मूर्खस्य पञ्च चिन्हानि गर्वो दुर्वचनं तथा। क्रोधश्च दृढवादश्च परवाक्येष्वनादरः॥
या सुभाषितात मूर्खांची पाच लक्षणे सांगितली आहेत. गर्व, अपशब्द वापरणे, क्रोध, हट्टीपणा आणि दुसर्याचे काहीही न ऐकणे ही ती पाच लक्षणे आहेत. आश्चर्य म्हणजे व्यसनाच्या गर्तेत खोल बुडालेल्या माणसांमध्येही अगदी हीच पाच लक्षणे आढळतात. सुरुवात डीनायलने झालेली असते. मला व्यसन नाहीच हा एकच घोषा व्यसनी व्यक्तीने लावलेला असतो. हाच हट्टीपणा. जवळची प्रेमाची माणसे उपाय करण्यास सांगतात. मदतीचा हात पुढे करतात. पण त्यांचे ऐकायला व्यसनी व्यक्ती तयार नसते. उलट तुम्हालाच उपायांची गरज आहे असे म्हणणारी मंडळी व्यसनी माणसांमध्ये भेटतात. दुसर्याने आपले भल्याचे सांगितले तरीही न ऐकणे हे एक महत्त्वाचे लक्षण त्यांच्यात आढळते.
शिवीगाळ तर पाचवीलाच पुजलेली असते. एरवी ज्यांच्या तोंडात कशीही शिवी येणार नाही अशी उच्चशिक्षित माणसे व्यसनात शिवीगाळ करताना आढळतात. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे व्यसनी माणसे पटकन चिडतात. राग हे व्यसनाचे महत्त्वाचे लक्षण आहे. आणि शेवटी मला सारे काही कळते ही समजूत बहुतेक व्यसनी माणसांमध्ये आढळते. हाच वर सांगितलेल्या लक्षणांमधला गर्व. मला तुम्ही काहीही सांगण्याची गरज नाही. मला सारी ठावूक आहे असे व्यसनी माणसांना वाटत असते. त्यामुळेच योग्य सल्लाही डावलला जातो.
संस्कृत वाङ्मयातील सुभाषितात ही लक्षणे मूर्खांची म्हणून गणली गेली आहेत. व्यसनीमाणसेही मूर्खपणा करून आयुष्याचा खेळखंडोबाच करीत असतात. त्यामुळे ही लक्षणे व्यसनी माणसांनाही लागु पडतात. यापुढील लेखांमध्ये संस्कृत वाङ्मयातील अशीच सुभाषितमौक्तिके, काही निवडक प्रसंग, सुविचार निवडून त्यांचा व्यसनाशी, व्यसनमुक्तीशी काय संबंध आहे हे पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. वाचकांना हा प्रयत्न आवडेल अशी आशा आहे.
अतुल ठाकुर
You are here:
- Home
- व्यसनमुक्ती
- संस्कृत व्यसनमुक्तीसाठी…!
संस्कृत व्यसनमुक्तीसाठी…!
1 Comment
Can I just say what a relief to find someone who actually knows what theyre talking about on the internet. You definitely know how to bring an issue to light and make it important. More people need to read this and understand this side of the story. I cant believe youre not more popular because you definitely have the gift.