फक्त आजचा दिवस – ३९ – घरातील परीस्थिती

नमस्कार,

घरात व्यसन आहे हे कळल्यावर जेव्हा इतरजण पत्नीला समजवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा घरात व्यसनामुळे काय काय होऊ शकतं हे तिला समजवणार्‍यांनीही लक्षात घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. व्यसनाच्या संदर्भात बरेचदा परदु:ख शीतल असतं म्हणतात तसं दुर्दैवाने होतं ही वस्तुस्थिती आहे. व्यसनाचे भयंकर भीषण परिणाम ज्यांनी अनुभवले नाहीत त्यांनी फार जबाबदारीने त्यावर बोलले पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं.

उदाहरण द्यायचं झालं तर व्यसनासाठी पैसे दिले नाहीत म्हणून स्वतःला गंभीर इजा करणारा रुग्ण मला माहित आहे. व्यसनासाठी पैसे दिले नाहीत म्हणून रस्त्यावर अनोळखी प्रदेशात अनोळखी लोकांसमोर भर रस्त्यात बायकोला गलिच्छ शिव्या देणारा माणूस मला माहित आहे. व्यसनासाठी घरातील दागिने, वस्तु विकणारे तर कित्येक मिळतील. व्यसनात केलेली कर्ज फेडायला वर्षानुवर्षे जाण्याचे उदाहरण माझ्यासमोर आहे.

त्यामुळे उपदेश करण्याआधी व्यसन म्हणजे काय असते, त्याची तीव्रता कशी असते हे माहित असायला हवं. व्यसनाचे इतर त्रास काय असतात त्यांची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment

You may also like...