डॉ. मंगलाताई जोगळेकर यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या “काळजीवाहक म्हणून घडतांना” या पुस्तकाचे हे परीक्षण नाही. किंवा हा परिचय देखील नाही. मानसशास्त्र व समाजशास्त्राचा विद्यार्थी म्हणून हे पुस्तक मला अतिशय वेगळं वाटलं. या पुस्तकाच्या महत्वाच्या वैशिष्ट्यांबद्दल लिहावसं वाटलं म्हणून हा लेखनप्रपंच. पुण्यातील मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्रात पीएचडीच्या संशोधनासाठी जात होतो. त्यावेळी स्वमदतगट हा माझ्या प्रबंधाचा विषय होता. गंभीर आजारांशी संबंधित स्वमदतगटांची माहिती मिळवित होतो. हे पुस्तक अशा तऱ्हेने काही बाबतीत माझ्या संशोधनाशीदेखील संबंधित आहे. म्हणूनही या पुस्तकाबद्दल आवर्जून लिहावेसे वाटले. छोटेखानी अशा जवळपास पंचेचाळीस लेखांनी हे पुस्तक घडले आहे.
आमच्या संस्कृत वाङ्मयात सूत्रवाङ्मय हा एक साहित्यप्रकार आहे. अनेकांना पातंजल योगसूत्रं ठावूक असतील. अल्पाक्षरी असूनही प्रचंड अर्थ ठासून भरलेला असणं असं या सूत्रांचं स्वरुप असतं. मंगलाताईंच्या या पुस्तकातील हे पंचाचाळीस लेख तसेच छोटे असूनही त्यांचा आवाका मोठा आहे. लेख आणि भाषा समजायला सोपी असूनही रोजच्या उदाहरणांनी ती रोचक आणि रंजक केली आहे. हे लेख वाचत गेल्यावर आपण काळजीवाहक असल्यास आपल्याला यातील अनेक अनुभव येऊन गेल्याचा फिल येतो आणि हे पुस्तक जास्त जवळचं वाटू लागतं. हे पुस्तक डिमेंशियवर असलं तरी कुठल्याही गंभीर आजाराच्या काळजीवाहकाला उपयुक्त आहे हे या पुस्तकाचं दुसरं वैशिष्ट्य.
या बाबतीत इतर आजारांचे उदाहरण देता येईल. सध्या माझं काम व्यसनमुक्ती आणि पार्किन्सन्स या दोन क्षेत्रांशी निगडीत आहे. हे दोन्ही गंभीर आजार. विज्ञानाकडे यावर पूर्ण बरे होण्यासाठी उपचार नाहीत. हे आटोक्यात ठेवता येतात. पार्किन्सन्स हा डिमेंशियाप्रमाणेच वाढत जाणारा आजार आहे. तर व्यसनमुक्त झाल्यावर माणुस सर्वसामान्य आयुष्य जगत असला तरी त्याला स्लिप अथवा रिलॅप्स होण्यापासून नेहेमी काळजी घ्यावी लागतेच. अशा आजारांमध्ये काळजीवाहकाचा कस लागत असतो. अशावेळी या पुस्तकातील काही टीप्स कुठ्ल्याही आजारात उपयोगी पडू शकतील अशा आहेत. उदाहरणार्थ, सहनशक्ती शीर्षकाचा लेखच या पुस्तकात आहे. त्यात मंगलाताई म्हणतात परीस्थिती हाताबाहेर गेल्यावर सहनशक्ती ठेवायला आपण संत नाही. त्यामुळे अशावेळी आपल्या हातून झालेल्या चुकांना स्वतःच क्षमा करायला हवी. या पुस्तकाचं वेगळेपण हे इथे आहे. अशा तऱ्हेच्या अतिशय प्रॅक्टीकल सूचनांनी हे पुस्तक भरलेले आहे.
त्यानंतर मला भावलेली गोष्ट म्हणजे हे डिमेंशियावर आहे ज्यात रुग्ण तुम्हाला ओळखण्याची शक्यता हळुहळू कमी होत जाते. त्यामुळे रुग्णाकडून तुम्हाला फारशा अपेक्षा ठेवता येत नाहीत. फार पूर्वी एक वाक्य वाचले होते. इफ यु डांस वेल यु कॅन वॉक इझीली. त्याची आठवण या पुस्तकामुळे झाली. डिमेंशियासारख्या रुग्णाला सांभाळण्याच्या सूचना जर आपण मार्गदर्शक म्हणून लक्षात घेतल्या तर त्या तूलनेने इतर आजारांच्या रुग्णांना सांभाळणे सोपे जाईल असे माझे वैयक्तीक मत आहे. कारण इतर आजांरांमध्ये रुग्ण तुम्हाला निदान ओळखत तरी असतो. मला आणखी आवडलेली गोष्ट मी आधीच्या लेखातही नमूद केली आहेच. काळजीवाहकाची काळजी हे पुस्तक घेते.
आपल्याकडे काळजीवाहकाची काळजी ही संकल्पना तशी नवीनच म्हणावी लागेल. अनेकजण गंभीर आजाराच्या रुग्णांना सांभाळताना स्वतःच आजारी पडताना दिसतात. अगदी शारिरीक नसले तरी काहींना नैराश्यासारखे मानसिक आजार जडताना दिसतात. गंभीर आजार झालेल्या रुग्णांना सांभाळताना स्वतःचीही काळजी घ्यावी लागते. कारण तुम्ही चांगले असाल तरच आपल्या रुग्णाला नीटपणे सांभाळू शकाल. यावर या पुस्तकाचा भर आहे. पुस्तकाचे वाचन करताना मला अगदी सुरुवातीला जे जाणवले ते येथे मांडले आहे. पुढच्या काही लेखांमध्ये आणखी काही महत्वाच्या गोष्टींचा उहापोह असेल.
अतुल ठाकुर
काळजीवाहक म्हणून घडतांना – १
4 Comments
हे पुस्तक अतिशय चांगले आहे. काळजीवाहकांसाठी उपयुक्त
एखादे मॅन्युअल असावे तसे. मी मंगलाताईंच्या बरोबर memory lab मध्ये volunteer म्हणून जाते . तेव्हा त्यांचे बोलणे वावरणे शुभंकर आणि शुभार्थी यांच्यासोबत जसे सौहृद्रपूर्वक असते.सहानुभाव पूर्वक असते तसेच लेखन पण आहे. आपण पुस्तकाबद्दल खूप चांगली माहिती दिली
Yo, mm88b is where it’s at! Been hitting it up after work, and it’s a good way to unwind. Give it a bash! mm88b
456betdownload is the real deal. Downloaded the app, and it’s smooth sailing. Worth checking out if you’re on the go. 456betdownload
Dellmx7k seems promising. Just started exploring, but so far, so good. Fingers crossed for some wins! dellmx7k