फक्त आजचा दिवस – ७३ – सत्याचा स्वीकार म्हणजे नक्की काय?

व्यसनाच्या बाबतीत सत्याचा स्वीकार म्हटलं तर सोपा आणि म्हटलं तर कठीण असतो. जर स्वतःच्या आवडी निवडी बाजूला ठेवल्या, व्यसनाविषयीचे प्रेम बाजूला ठेवले, आपले व्यसनामुळे किती नुकसान झाले आहे हे लक्षात घेतले, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या व्यसनामुळे किती निर्दोष लोकांना अतोनात त्रास झाला आहे हे नीट समजले तर सत्याचा स्वीकार ही तशी कठीण गोष्ट म्हणता येणार नाही. पण माणसे ती अवघड करून ठेवतात.

व्यसनाच्या बाबतीत सत्याचा स्वीकार म्हणजे आपल्याला व्यसनाचा आजार आहे हे मान्य करणे. त्यासाठी योग्य उपचार घेणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता आपण कधीही व्यसन करु शकणार नाही हे प्रामाणिकपणे मान्य करणे. माणसे पहिल्या दोन गोष्टीचा स्वीकार करतात पण तिसरी गोष्ट मात्र मनापासून मान्य करीत नाहीत. आणि व्यसनमुक्तीचा पुढचा प्रवास त्यामुळेच अवघड होऊन बसतो. जीवापाड प्रेम असलेलं व्यसन कायमचं सोडायचं ही अनेकांना कठीण गोष्ट वाटते. त्यामुळे आपल्याला कधीही व्यसन करता येणार नाही यापेक्षा आपण कंट्रोलमध्ये राहुया असे ते स्वतःला बजावतात आणि पुढे सर्व खेळखंडोबा होतो.

आपण कंट्रोलमध्ये राहुया असे जेव्हा माणसाला वाटते तेव्हा तो व्यसनाबद्दलच्या एका मोठ्या सत्याकडे पाठ फिरवत असतो.

आपला
अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment

You may also like...