फक्त आजचा दिवस – ३० – व्यसनमुक्तीसाठी ठामपणा हवा

नमस्कार,

व्यसनाकडे खेचणारे लोक तुमच्या आजुबाजुला असु शकतात. अशावेळी तुम्ही ठाम असाल तर ती माणसे तुमच्याशी बोलताना दहावेळा विचार करतील. मात्र तुम्ही दुबळेपणा दाखवलात की ती वरचढ होऊ लागतील हे लक्षात ठेवावे. एखाद्याशी बोलणे सुरु असताना ते जर हेतूपुरस्सर व्यसनाकडे वळू लागले तर ते बोलणे तेथेच थांबावे.

अनेकांची व्यसनाच्या बाबतीत स्वतःचीच समजूत काढण्याची पद्धत असते. ती धोकादायक असते असे माझे स्पष्ट मत आहे. म्हणजे माणसे स्वतःलाच समजवू लागतात. दारुचे सुख आपल्या नशीबी नाही. बाहेर लोक मजा करतात. पण आपल्याला व्यसनाचा आजार आहे आपण तो स्विकारला पाहिजे. आपल्याला ती मौज करता येणार नाही. वगैरे वगैरे..

ही अशा तर्‍हेने विचार करण्याची पद्धतच चुकीची आहे असे मला वाटते. एकदा व्यसनाबाबत असा विचारांचा कच्चेपणा मनात राहिला की त्याला आणखी दुबळे बनवणारे लोक आजुबाजुला असतातच म्हणून ठामपणा महत्त्वाचा.

ठामपणा हा वर्तनात का महत्त्वाचा असतो याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment

You may also like...