नमस्कार,
व्यसनमुक्तीकेंद्रातून आपण उपचार घेऊन जेव्हा बाहेर येतो तेव्हा आपल्याला बदलायचे असते. जग तसेच राहणार असते. आजुबाजुचा परिसर तसाच असतो. बार, गुत्ते आहेत त्याच जागी असतात. आणि दुर्दैवाने माणसेही तशीच असतात. तुमचे व्यसनी मित्र तसेच असतात. जेव्हा माणुस व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर येतो तेव्हा त्याला काही अडचणींना सामोरे जावे लागते. त्यातली एक अडचण म्हणजे ज्यांच्यासोबत व्यसन करीत होतो ते तथाकथित मित्र.
फार क्वचितच असे घडत असेल की आता आपला मित्र व्यसनमुक्तीकेंद्रात जाऊन आला. त्याला दारु झेपत नाही. त्याला आता व्यसनात खेचायचे नाही असा सूज्ञ विचार ही मित्र म्हणवणारी मंडळी करीत असतील. सर्वसाधारणपणे घडते असे की हे मित्र सोबर राहण्याची धडपड करणार्याला पुन्हा व्यसनाकडे खेचण्याचा प्रयत्न करु लागतात.
अशा मित्रांशी कसे वागावे याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
अतुल ठाकुर