नमस्कार,
व्यसनी माणसाचं ध्येय हे व्यसनमुक्ती असतं आणि त्या ध्येयापासून तुम्हाला जे विचार भरकटवतात ते अविवेकीच म्हणायला हवेत. काहीवेळा विशिष्ट वातावरणामुळे व्यसनाची आठवण येते. उदाहरणार्थ पाऊस, थंडी, गटारी, होळीसारखे सण, ३१ डिसेंबरसारखे दिवस हे व्यसनाची वातावरणनिर्मिती करीत असतात. अशा दिवशी किंवा प्रसंगी व्यसनाचे विचार मनात येण्याची शक्यता असते.
अशावेळी ते विचार मनात न घोळवता तसेच बाहेर जाउ देणे इष्ट. त्या विचारांवर चिंतन करीत बसु नये. काही सकारात्मक काम हाती घ्यावे. आपल्याला एखादा छंदअसेल तर तो अशावेळी उपयोगी पडू शकतो. काहींच्या मनात “अरे बाहेर बघा सर्वजण एंजॉय करीत आहेत आणि आपण येथे घरात बसलो आहोत” अशासारखा धोकादायक विचार मनात येऊ शकतो.
पुर्वीसारखे आपण आता व्यसन करु शकत नाही याचे दु:ख वाटणे ही धोक्याची घंटा आहे हे लक्षात ठेवावे. अशासारखा विचार मनात आल्यास काय करता येईल याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
अतुल ठाकुर