फक्त आजचा दिवस – २० – शेवटची बाटली गेटजवळ फेकली

नमस्कार,

मुक्तांगणमध्ये दाखल व्हायचे तर लगेच अ‍ॅडमिशन मिळतेच असे नाही. अनेकदा वेटींग लिस्ट असते. कुटूंबिय अगतिक झालेले असतात. कधी आपल्या माणसाला दाखल करुन घेताहेत असं त्यांना झालेलं असतं. अशावेळी जेव्हा एक दोन आठवड्यानंतरची तारीख मिळते तेव्हा मुक्तांगणची या लोकांकडून रास्त अपेक्षा अशी असते की या दोन आठवड्यात माणसाने व्यसनापासून दूर राहावं. पण अनेकदा घडतं उलटंच.

आपली अत्यंत आवडती वस्तु आता आपल्यापासून कायमची दूर जाणार याचं जणू व्यसनी माणसाला अतीव दु;ख होतं आणि कधी नव्हे इतके ते व्यसन करु लागतात. आता दारु कायमची सोडायची आहे मग पिऊन घेऊयात असा काहीतरी चमत्कारीक विचार ही माणसे करतात. मला एका शेयरींगमध्ये असंही ऐकल्याचं आठवतंय की मुक्तांगणला दाखल होताना रस्त्यातदेखिल पिणं सोडलं नाही. इतकंच नव्हे तर शेवटची बाटली मुक्तांगणाच्या गेटवर रिकामी करून फेकून दिली.

व्यसनाचा हा चिवटपणा पाहून थक्क व्हायला तर होतंच पण व्यसन ज्या तर्‍हेने माणसावर स्वार झालेलं असतं हे पाहून वाईटही वाटतं. व्यसन माणसावर अशा तर्‍हेने का स्वार होतं याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment

You may also like...