फक्त आजचा दिवस – १३ – प्रयोग करणे धोक्याचे

नमस्कार,

काही काळ व्यसनमुक्त राहिल्यावर ज्या माणसांच्या डोक्यात व्यसन पुन्हा डोकावू लागते त्यांच्या शरीरातूनच व्यसन गेलेले असेल कदाचित पण मनातुन पूर्णपणे व्यसन गेलेले नसते असे म्हणायला हरकत नाही. मग त्यांच्या मनात येते इतके दिवस आपण व्यसनापासून लांब राहिलो आहोत. आपला स्वतःवर ताबा आहे. मग थोडीशी घ्यायला काय हरकत आहे?

खरंतर हा विचार येताक्षणी एकतर तुम्ही तुमच्या समुपदेशकाला फोन करायला हवा. किंवा आपल्या प्रेमाच्या माणसांशी बोलायला हवं. म्हणजे ती माणसे तुम्हाला या विचारांमधून बाहेर काढतील. व्यसनाकडे नेणार्‍या मित्रांशी कधीही संपर्क करु नये. ते तुम्हाला मातीत घालतील. व्यसनाच्या विचारांना मनात घोळवत ठेवणे फार धोक्याचे. कारण विचारांवरुन कृतीवर यायला वेळ लागत नाही.

पण व्यसनात सर्वात वाईट असते ती प्रयोग करण्याची सवय. आज एकच पेग घेऊन बघुयात. फक्त बियरच घेउन बघुयात. हे आणि अशासारखे विचार हेच दर्शवतात की तुम्ही मनाने व्यसन सोडलेलेच नाही. मनात व्यसन असले की काय काय घडते याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment

You may also like...