अग्निशेषम् ऋणशेषम् शत्रुशेषम् तथैव च |
पुन: पुन: प्रवर्धेत तस्मात् शेषम् न कारयेत् ||
अग्नि, ऋण आणि शत्रूचा समूळ नाश करावा असं सुभाषितकार सांगत आहेत. कारण यापैकी कुठलाही एक थोडाजरी उरला तरी तो वाढतो. आणि अर्थातच वाढल्यावर या गोष्टी डोईजड होतात हे सूज्ञांस सांगणे न लगे.
व्यसनमुक्तीसाठी अतिशय आदर्श असे हे सुभाषित आहे. या तिन्हीप्रमाणेच व्यसन किंवा व्यसनाचा विचारही आपण आपल्यात थोडाही उरु देऊ नये. त्याचा समूळ नाश करावा. कारण तो थोडाजरी उरला तरी वाढतो. मग विचारांवरून माणुस कृतीवर येण्यास वेळ लागत नाही. त्यापुढे स्लिप किंवा रिलॅप्स ठरलेलीच. त्यामुळे मी थोडेसे व्यसन करीन, मर्यादेत राहिन अशासारखे विचारही मनात आणु नयेत हेच आपण या सुभाषितातून घेऊयात.
अतुल ठाकुर