फक्त आजचा दिवस – ४७ – सणाचे दिवस आणि व्यसन

नमस्कार,

व्यसन असताना सणासुदीचे दिवस आले की घरातील मंडळींना विशेषतः स्त्रीयांना एक अनामिक भीती वाटु लागते. याचे कारण पूर्वी ऐन सणाच्या दिवसात व्यसनी व्यक्तीने घरात गोंधळ घातलेला असतो. ही भीती किती पोखरणारी असते याची ज्यांच्या घरात व्यसन असेल त्यांनाच खरी कल्पना येऊ शकते. नुसते सणच नव्हे तर घरातील एखादा समारंभ असला तरी आता ही व्यसनी व्यक्ती काही गोंधळ घालून सर्व कार्यक्रम नासवणार तर नाही ना अशी घरच्यांना भीती वाटत राहते.

सणासमारंभाला शेजारपाजारचे लोक आणि इष्टमित्र आणि नातेवाईक येतात. त्यांच्यासमोर तमाशा होऊ नये म्हणून घरच्यांचे काळीज धडधडत असते. अशाप्रसंगी काही माणसे आपली फजीती पाहायलादेखिल टपलेली असतात ही एक दु:खद वस्तुस्थिती असते. काही ठिकाणी मरण आणि तोरण या दोन्ही घटना दारु पिऊन साजरा करण्याची पद्धत आहे. अशावेळी नेमकी तुमच्या जवळचीच व्यक्ती व्यसनी व्यक्तीला दारु आणून देणारी निघते ही आणखी एक दु:खाची गोष्ट.

जणू काही व्यसनी व्यक्तीला चोरून दारु पुरवून आपण काहीतरी फार मोठे मानवतेचे काम करीत आहोत अशा थाटात ऐन समारंभाच्यावेळी व्यसनी व्यक्तीला आडबाजूला नेऊन दारु पुरवली जाते. पुढे जे टाळायचा घरचे अतोनात प्रयत्न करीत असतात ते घडतेच. व्यसनामुळे घरात आणखी काय घडतं याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment

You may also like...